1.9 KiB
1.9 KiB
७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे
अहो ताठ मानेच्या लोकांनो...स्तेफन यहूदी लोकांपासून स्वत:ला वेगळे करीत त्यांची खरडपट्टी काढीत आहे.
हृदयाची सुंता न झालेले
"हृदयाचे अवज्ञाकारी" स्तेफनाने त्यांची तुलना कदाचित परराष्ट्रीयांबरोबर केली असावी, ते त्या तुलनेस त्यांचा अपमान म्हणून समजले असावेत.
असा कोणता संदेष्टा होता ज्याला तुमच्या पूर्वजांनी छळले नाही?
हा अलंकारयुक्त प्रश्न आहे ज्याद्वारे स्तेफन त्यांची खरडपट्टी काढीत आहे. ह्याचे अशाप्रकारेहि भाषांतर केले जाऊ शकते, "तुमच्या पूर्वजांनी प्रत्येक संदष्टाचा छळ केला" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
नीतिमान पुरुष
हे ख्रिस्त जो मसीहा त्याचा उल्लेख करते.
त्याला जिवे मारणारे
"नीतिमान पुरुषाला ठार मारणारे" किंवा "ख्रिस्ताला ठार मारणारे."